

H2: Microtech Polymers Wins JRD Tata Award 2026
esakal
लोणी काळभोर : अवघ्या ३०० चौरस फुटांच्या जागेतून सुरू झालेल्या उद्योगाने जिद्द, मेहनत आणि व्यावसायिक दूरदृष्टीच्या जोरावर थेट जागतिक बाजारपेठेत झेप घेतली आहे. पुण्यातील मायक्रोटेक पॉलिमर्स या उद्योगाने राष्ट्रीय स्तरावर मानाचा जेआरडी टाटा पुरस्कार २०२६ पटकावून आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे. रूपेश शिवरकर आणि गणेश जाधव यांच्या संयुक्त भागीदारीतील या उद्योगाला ‘फास्टेस्ट ग्रोइंग आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर’ या श्रेणीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे हा सन्मान करण्यात आला.