Sukhoi Jet
sakal
पुणे - पुण्याच्या आकाशात बुधवारी मध्य रात्रीच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी प्रचंड गर्जना केली. लोहगाव हवाईदल तळावरून सुरू असलेल्या विशेष सराव मोहिमेमुळे कोथरूड, विमाननगर, लोहगाव आणि धानोरी परिसरात लढाऊ विमाने कमी उंचीवरून उडाल्याने विमानाचा मोठा आवाज आला. त्यामुळे नागरिक जागे झाले. सुखोई या शक्तिशाली लढाऊ विमानांनी कमी उंचीवरून उड्डाण केल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.