Pune election voting
पुणे - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा प्रश्न वेगळा असतो. महापालिका निवडणुकीत आमच्या अडचणीच्या काळात धावून येणाऱ्या, पोटतिडकीने प्रश्न सोडविणाऱ्या उमेदवारांनाच आम्ही मतदान करणार आहोत, मग तो कोणत्याही पक्षातील असू द्या किंवा अपक्ष असू द्या, अशी भावना पुण्यात वर्षानुवर्षे स्थायिक झालेल्या परराज्यातील नागरिकांनी व्यक्त केली.