

Migratory Birds Find Shelter in Pune Amid Climate Change
sakal
Climate Change Impact on Migratory Birds in India: सायबेरियातील कडाक्याची थंडी, मध्य आशियातील अन्नटंचाई आणि युरोप हिमालयीन भागातील बदलते हवामान यामुळे हजारो किलोमीटरचा प्रवास करत स्थलांतरित पक्षी दरवर्षी हिवाळ्यात पुणे आणि परिसरात दाखल होत आहेत. समशितोष्ण हवामान, मुबलक पाणथळ क्षेत्रे आणि अन्नसाखळीची उपलब्धता यामुळे पुणे शहर आणि आसपासचा परिसर हिवाळ्यात पक्ष्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरत आहे.