मुळशी धरण परिसरात भुकंपाचे धक्के! ५०० मीटर जमीन दुभंगली

भुस्‍खलनाच्‍या कारणांची शोध घेण्‍याची गरज निंबारवाडी येथे टप्‍प्‍या टप्‍प्‍याने अंतरावर तीन-चार ठिकाणी भेगा पडल्‍या
Earthquake in Mulshi
Earthquake in Mulshi

माले : मुळशी धरण परिसरात ग्रुपग्रामपंचायत वांद्रे अंतर्गत येणा-या निंबारवाडी (ता.मुळशी) येथे जमिनीला भेगा पडण्‍याचा प्रकार (ता.१७) निदर्शनास आला. वाघवाडी येथील भु्स्‍ख्‍ालनाप्रमाणे आता निंबारवाडी परिसरात मोठया भेगा पडल्‍याचे दिसून आले. लागोपाठ दोन दिवसात घडलेल्‍या भुस्‍खलनाची ही दुसरी घटना आहे. भुस्‍खलनाच्‍या कारणांची शोध घेण्‍याची गरज निंबारवाडी येथे टप्‍प्‍या टप्‍प्‍याने अंतरावर तीन-चार ठिकाणी भेगा पडल्‍या आहेत. टाटा तलावाच्‍या बाजुला जमिन दोन-तीन फुट खचली आहे. त्‍यामुळे येथील कुटूंबांना हलवून जिल्‍हा परिषद शाळेत तात्‍पुरती व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. दोन दिवसांपुर्वीच वाघवाडी येथेही असाच प्रकार घडला होता. त्‍यामुळे मुळशी धरण भागात घुटके या गावानंतर वाघवाडी व निंबारवाडी ची भर पडली आहे. उपसरपंच विशाल पडवळ, सामाजिक कार्यकर्ते विनायक कोकरे आदींनी पुनर्वसनाची मागणी केली आहे. (Earthquake in Mulshi)

टाटा प्रशासनाने भुस्‍खलनाच्‍या कारणाची शोध घेण्‍यासाठी या दिवसांतील मुळशी धरणाच्‍या भुकंपमापक यंत्राच्‍या नोंदी तपासल्‍या असता अत्‍यंत सौम्‍य कंपनांच्‍या नोंदी आढळल्‍या. खबरदारी म्‍हणुन प्रशासनास कळविण्‍यात आले. मात्र या नोंदी तज्ज्ञांकडे पाठवून त्‍यांचे विश्‍लेषण केले असता त्‍यांनी ही कंपने भुकंपाची नसल्‍याचे सांगितले आहे. भुकंपमापक यंत्रे अत्‍यंत जमिनीतील अत्‍यंत सुक्ष्‍म कंपनेही नोंदवित असतात. झालेले भुस्‍खलनाचे अतिवृष्‍टी किंवा अन्‍य कोणतेही कारण असु शकते.दरम्‍यान मुळशीचे माजी आमदार शरद ढमाले, तहसिलदार अभय चव्‍हाण यांनी वाघवाडी येथे भेट देऊन पाहणी केली. याबाबत तहसिलदार अभय चव्‍हाण यांनी माहिती दिली की,'वाघवाडी व निंबारवाडी येथे एक ते दीड फुट खोल व सुमारे ५०० मीटर लांब भेग पडली आहे. जमिन खचण्‍याचे प्रमाण वाढत आहे. सौम्‍य भुकंपाचे कारण असु शकते असे टाटा पॉवर प्रशासनाने कळवले आहे, मात्र भारतीय भुवैज्ञानिक सर्व्‍हेक्षण भारत सरकार यांचे मार्फत सखोल तपासणी करणे गरजेचे आहे.

दोन्‍ही ठिकाणच्‍या ग्रामस्‍थांची सुरक्षित ठिकाणी व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.'कंपने भुकंपाची नाहीत-सखोल अभ्‍यास गरजेचा-टाटा कंपनी टाटा पॉवर कंपनीच्‍या जलविद्युत विभागाचे प्रमुख प्रभाकर काळे यांनी याबाबत जिल्‍हाधिकारी यांनी पत्राद्वारे कळविले आहे की, 'मुळशी धरणावर असणा-या भुकंपमापक केंद्रामध्‍ये कंपने नोंदविली गेली होती. ही कंपने भुकंपाची नसुन अंदाजे ४०-४२ किलोमीटर काही आघातजनक हालचाली जसे की विस्‍फोट, भुस्‍खलन मुळे झाली असावे असा अंदाज आहे. त्‍यामुळे या ठिकाणी भुकंप झाले नसुन नोंद झालेली कंपने ही अतिशय कमी तीव्रतेची (0.2g) असल्‍याचे दिसुन येते. वाघवाडी व निंबारवाडी येथील भुस्‍खलन नेमके कशामुळे झाले याबाबत भारतीय भूवैज्ञानिक सर्व्‍हेक्षण संस्‍था पुणे यांच्‍याकडून पडताळून घेणेबाबत विनंती केली आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com