पुणे : चौकशी आयोगासमोर येण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार

पुणे : चौकशी आयोगासमोर येण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार

पुणे : समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर शुक्रवारी लेखी अर्ज सादर करून साक्षीकरिता गैरहजर राहता यावे, यासाठी अर्ज केला आहे. आयोगाने हा अर्ज मान्य केल्याची माहिती आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी दिली आहे.

कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाचे न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि सदस्य माजी मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांच्यासमोर एकबोटे यांची साक्ष नोंदवली जाणार होती. एकबोटे यांनी आयोगाला दिलेल्या अर्जात नमूद आहे की, एक जानेवारी 2018 रोजी कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली. या घटनेच्या अनुषंगाने माझे प्रतिज्ञापत्र आयोगासमोर सादर केले. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात आपल्या विरोधात शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र, राजकीय षड्यंत्रातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक झाल्यानंतर चौकशीदरम्यान माझ्याविरोधात कोणते पुरावे मिळून आलेले नाहीत. न्यायालयाने या प्रकरणात मला जामीन मंजूर केलेला आहे. एल्गार परिषदेच्या आयोजकांनी डाव्या संघटनेच्या मदतीने तसेच नक्षलवादी संघटनांद्वारे जाणीवपूर्वक एक ते तीन जानेवारी 2018 दरम्यान कोरेगाव भीमा, वढू व राज्यात आंदोलन पेटवले.

ब्राम्हण जातीत माझा जन्म झाल्याने आणि राजकीय पार्श्वभूमीमुळे जाणीवपूर्वक मला सदर संघटनांनी लक्ष्य केले आहे. आतापर्यंत या प्रकरणाचा तपास पोलिस पारदर्शकपणे करत होते आणि त्यांनी नक्षलवादी संबंध उघडकीस आणले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com