दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ; दुग्धजन्य पदार्थ १० टक्क्यांनी महागणार

दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ; दुग्धजन्य पदार्थ १० टक्क्यांनी महागणार
Published on

दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ; दुग्धजन्य पदार्थ १० टक्क्यांनी महागणार

वाहतूक, साखर व पॅकिंग खर्चवाढीचा परिणाम; गायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १० : वाढत्या उत्पादन, वाहतूक आणि पॅकिंग खर्चाच्या पार्श्वभूमीवर दूध विक्री दरात दोन रुपये तर दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे. मंगळवार (ता. ११) पासून याची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, यापूर्वीच दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ झाली असून गायीच्या दूध खरेदी दरात आणखी एक रुपयाची वाढ होणार आहे. गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ४० रुपये होणार आहे.

कात्रज डेअरी येथे संघाच्या सभासदांची अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काळात डिझेलच्या दरात प्रतिलिटर १० रुपयांनी वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. साखरेच्या दरात प्रतिकिलो १२ रुपयांची वाढ झाली असून, पॅकिंग खर्चातही ३० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. परिणामी दूध खरेदी, प्रक्रिया, पॅकिंग आणि वाहतुकीचा एकूण खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या दरवाढीमुळे वाढलेल्या उत्पादन व अन्य खर्चाची काही प्रमाणात भरपाई होऊन दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होईल, असे संघाने म्हटले आहे.

--
चौकट

दूध खरेदी दरात पुन्हा वाढ
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुधातील भेसळीविरोधात मोहीम तीव्र केल्याने भेसळखोरांना चाप बसला आहे. तसेच ॲनालॉग चीजवरील बंदीचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर दूध खरेदी दरात वाढ होण्याची अपेक्षा होती. त्यानुसार राज्यातील दूध संस्थांनी गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, म्हशीच्या दूध खरेदी दरात यापूर्वीच प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.


कोट
PNE26W41482
दूध खरेदी दरात यापूर्वीच वाढ करण्यात आली आहे. गायीच्या दूध खरेदी दरात आता आणखी एक रुपयाची वाढ होणार आहे. वाढलेल्या इंधन दरामुळे वाहतूक खर्चात पडलेली भर, साखर दर व पॅकिंग खर्च वाढल्यामुळे दुधाच्या विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीमुळे दूध उत्पादकांना योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार आहे.
प्रकाश कुतवळ, सचिव, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com