

Milk Rate Hike
कात्रज - इंधन, वाहतूक, पॅकिंग, मनुष्यबळ तसेच दूध खरेदी दरात सातत्याने होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये म्हशीच्या आणि गायींच्या दूधदरात प्रत्येकी चार रुपयांची वाढ होणार आहे. तसेच, दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. या नवीन दरांची अंमलबजावणी सोमवार (ता. १६) पासून होणार आहे.