esakal | कात्रज-कोंढव्यात नियम मोडणाऱ्यांकडून लाखोंचा दंड वसूल
sakal

बोलून बातमी शोधा

Police

कात्रज-कोंढव्यात नियम मोडणाऱ्यांकडून लाखोंचा दंड वसूल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कात्रज - कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेतही (Second Wave) नागरिक बेफिकीर असल्याचे चित्र सध्या उपनगरांत दिसत आहे. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी मास्क (Mask) न घालणे व सामाजिक आंतर न ठेवणाऱ्या नागरिकांवर (Public) कारवाई (Crime) करत मागील १०० दिवसांच्या कालावधीत साडेसात लाखांच्या वर दंड (Fine) वसूल (Recovery) करण्यात आला आहे. (Million rupees fine for violating rules in Katraj Kondhwa)

१ फेब्रुवारीपासून १० मे २०२१ पर्यंत कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडून १४२१ नागरिकांना दंड करण्यात आला आहे. या दंडापोटी एकूण ७ लाख ७९ हजार ८५० रुपये नागरिकांकडून वसूल करण्यात आले आहेत. एवढा दंड वसूल करूनही नागरिक मात्र बेफिकीर असल्याचे दिसून येत असून सर्रास विनामास्क फिरताना दिसतात. ही कारवाई कोंढवा येवलेवाडी कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी डॉ. ज्योती धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक मंदृपकर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, आरोग्य निरीक्षक विकास मोरे, अभिजीत सुर्यवंशी, सचिन बिबवे उमेश ठोंबरे सुनिल गोसावी आदीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा: बाणेरमधील मायलेकींना आगीतून वाचवण्यासाठी धावला 'मारुती'

कोरोनाची दुसरी लाट अधिक प्रभावी असल्याने नागरिकांनी स्वतः हून काळजी घेणे अपेक्षित आहे. परंतु नागरिक काळजी नसल्यासारखे वागत आहेत. कोणत्याही सुचनांचे पालन करत नाहीत. आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र नागरिक ऐकत नाहीत. दंडात्मक कारवाई करताना उद्धटपणे वागतात. मात्र, नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे असून काळजी घ्यायला हवी, अन्यथा प्रशासन अधिक कडक कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने यांनी सांगितले.

loading image
go to top