
Junner Flood
Sakal
दत्ता म्हसकर
जुन्नर : मीना नदीला आलेल्या पुरामुळे निमदरी ता.जुन्नर येथील नदी किनारी असलेले रेणुकामाता मंदीर व परिसर (आज ता.२८) पाण्याने वेढला गेला.रात्रीपासून सुरू असलेल्या जोराच्या पावसामुळे आज रविवार ता.२८ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मंदिरात पुराचे पाणी येण्यास सुरुवात झाली.थोड्याच वेळात मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच परिसर पाण्याने भरून गेला.