भविष्यातील ‘मिनी कोकण’

भविष्यातील ‘मिनी कोकण’
Published on

भविष्यातील ‘मिनी कोकण’

इन्फो
...
आगडगावची भौगोलिक रचना सुंदर आहे. ‘मिनी कोकण’ अशी उक्ती शोभते. ग्रामपंचायत व भैरवनाथ देवस्थान ही दोन चाके गावगाड्याच्या विकासाला लाभलेली आहेत. त्या माध्यमातून भविष्यात गाव प्रगतिपथावर राहील.

- पोपटराव गावडे, ग्रामविस्तार अधिकारी.

नगर तालुक्यातील मोठं गाव म्हणून या गावची ओळख. दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांचा जोडधंदा. शहरापासून जवळ, रस्ताही चांगला असल्याने अनेक लोकं मजुरीसाठी शहरात जातात. साहजिकच शेतमजुरांची वानवा जाणवते. गावातील लोक मायाळू आहेत. पदाधिकारीही चांगले आहेत. इतर काही गावांप्रमाणे राजकारण अगदी टोकाला जात नाही. निवडणुकांपुरते राजकारण होते. नंतर मात्र सर्व एकत्र येतात, हे विशेष.
गेल्या चार वर्षांत अनेक कामे शासनाकडून मंजूर झाली. मुख्य गाव ते देवस्थान रस्ता सिमेंटचा झाला. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई साधारण फेब्रुवारी ते जुलै या दरम्यान होते. त्यावर मात कशी करता येईल, याबाबत ग्रामस्थांशी, पदाधिकारी, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. या प्रश्नावर मात करण्यासाठी बारादरी येथे असलेली विहीर ६० फूट खोल करण्यात आली. आडवे बोअर घेतले. उदभवाचे बळकटीकरण करताना अधिकाऱ्यांसमोर वस्तुस्थिती मांडल्याने डागडुजी झाली. २०१२ मध्ये झालेली पाइपलाइन दुरुस्त करणे मोठे जिकिरीचे काम होते. अनेक अडथळ्यांची शर्यत जिंकत ती दुरुस्त झाली. आता उन्हाळ्यातही गावाला पाणी मिळते. वनराई संस्थेच्या माध्यमातून अनेक कामे झाली. जिल्हा परिषद शाळेला खोल्यांसाठी निधी मिळाला. यासाठी भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनीही निधी दिला. सुंदर खोल्या झाल्या. गावात आरोग्यविषयक सुविधा मिळण्यासाठी आरोग्य उपकेंद्र होण्याची गरज आहे. त्याचा प्रस्ताव करून सरपंच व सदस्यांनी पाठपुरावा केला. गेल्या सहा वर्षांत गावात ८९ घरांना मंजुरी मिळाली. त्यावर सोलर प्रकल्प बसविण्यात येत आहेत. असे उपक्रम राबविणारे हे गाव तालुक्यात अव्वल असेल.
‘वनराई’च्या माध्यमातून भूसंवर्धनाची कामे झाली. तलाव, नद्यांतील गाळ काढला. पाणी संकलनासाठी पुनर्भरण केले. पाझर तलावातील गाळ काढल्याने साठवण क्षमता वाढली. सुमारे ८० लाखांची कामे झाली. टोकेवाडीसाठी ५० हजार लिटरची टाकी मिळाली. दोन रस्त्यांची कामे केली. सभामंडपाचा प्रस्तावही मंजूर झाला आहे.
गावाची शैक्षणिक प्रगती साधताना शाळा खोल्यांबरोबरच डिजिटल पॅनेल मिळविण्यात आले. संगणकीकृत शाळा झाल्याने उच्च दर्जाचे शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध झाली. सौर पॅनलही दिल्याने वीजबिलमुक्त शाळा झाली. महिलांसाठी गावात २९ बचत गट आहेत. त्यांचे सक्षमीकरण, सबलीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकरी मेळावे घेतले. कृषिपूरक उद्योगांना प्राधान्य देण्यात येत आहे. शासकीय योजना राबविल्यामुळे अनेक गरजूंना फायदा झाला.
गावात चांगले काम करता आले, यासाठी ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना ग्रामस्थ, पदाधिकारी साथ देतात. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) दादाभाऊ गुंजाळ, गटविकास अधिकारी राजेंद्र देसले, विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे व रामदास दळवी आदींचे मार्गदर्शन मिळते. ही सर्व कामे करताना सरपंच, सदस्यांची मोठी साथ लाभते. गावाची भौगोलिक रचना सुंदर आहे. आध्यात्मिक स्थान चांगले आहे. त्यामुळे भविष्यात हे गाव कायम आघाडीवर असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com