
पुणे : ‘‘राज्य कामगार विमा योजना ही केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात आहे. या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा उत्तम प्रकारच्या असून यांचा लाभ तळागाळातील गरजू कामगारांपर्यंत पोहोचवा’’, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.