

State Sanctions ₹350 Crore to Strengthen Electricity Network in Twin Cities
sakal
पिंपरी: पिंपरी चिंचवडच्या वीज आराखड्यासाठी पुनर्गठित वितरण क्षेत्रासह आणि इतर योजनांमधून निधीची तरतूद केली आहे. पुणे जिल्ह्यासाठी ११०० कोटींचा प्रस्ताव आहे. त्यातून पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी ३५० कोटी आहेत. ताथवडे उपकेंद्राचा प्रस्ताव महापारेषणकडे दीड वर्षांपासून का प्रलंबित आहे, याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पुण्यातील लोकप्रतिनिधींसोबत लवकरच बैठक घेऊन या सर्व प्रलंबित कामांचा आढावा घेतला जाईल, असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.