Pune News : नागरी समस्या सोडविण्याचे नियोजन करा; राज्यमंत्री मिसाळ यांचे ‘पीएमआरडीए’ प्रशासनाला आदेश
Pune Traffic : पुण्यातील नागरी व वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पीएमआरडीएने प्रभावी नियोजन करावे, असा आदेश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठकीत दिला.
पिंपरी : पुणे शहर परिसरात नागरी समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या सोडविण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नियोजन करावे, असे आदेश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी (ता. २६) पीएमआरडीए प्रशासनाला दिले.