औरंगजेबाने (Aurangzeb) छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून मारले, त्याची कबर येथून हटवली पाहिजे, असेही ते म्हणाले.
जुन्नर/ओझर : ‘‘छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) तिथीप्रमाणे साजरी व्हावी, तसेच त्यासाठी शासकीय निधी प्राप्त व्हावा, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे,’’ अशी ग्वाही मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी किल्ले शिवनेरी येथे दिली.