esakal | भिगवण येथे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन

बोलून बातमी शोधा

covid centre
भिगवण येथे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन
sakal_logo
By
प्रा. प्रशांत चवरे, भिगवण.

भिगवण : इंदापुर, भिगवण व परिसरातील कोरोना रुग्णांची वाढती गरज विचारात घेऊन भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटर इमारतीमध्ये सुरु असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात आले.

हेही वाचा: जुन्नर तालुक्यात ऑक्सिजन सिलेंडरची तीव्र टंचाई

कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आय़ुष प्रसाद, प्रभारी तहसलिदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रताप पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सचिन बोगावत, धनाजी थोरात,तुषार क्षीरसागर, डॉ. चंद्रकांत खानावरे, सरपंच तानाजी वायसे, तक्रारवाडीचे सरपंच सतीश वाघ, नितीन काळंगे, मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी तीन हजार २४८ रेमडेसिव्हीर; ऑक्सिजनच्याही मागणीत वाढ

दहा बेडच्या ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री भरणे यांनी येथील सेंटरची पाहणी केली व उपलब्ध सुविधांबाबत माहिती घेतली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, ''इंदापुर तालुक्यामध्ये सध्या एक हजार सहाशे त्रेसष्ट सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. रुग्णांना योग्य ते उपचार मिळावे यासाठी तालुक्यामध्ये आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. भिगवण येथे ६६ आयसोलेशन बेड सुविधा आहे त्यामध्ये आत्ता १० ऑक्सिजन बेडची भर पडलेली आहे. भिगवण येथे टप्प्याटप्प्याने येथे पन्नास ऑक्सिजनयुक्त बेडची सोय उपलब्ध करु देऊ. येथील कोविड सेंटरमध्ये आवश्यक डॉक्टर इतर स्टाफचीही नेमणुक केली आहे. सध्याचा काळ अतिशय कठीण आहे नागरिकांनी शासनाच्या वतीने वेळोवेळी लागु केलेल्या निर्बंधाचे पालन करावे.''