esakal | राज्यमंत्री भरणे म्हणताहेत, राजकारण सोडून नागरिकांना सहकार्य करा
sakal

बोलून बातमी शोधा

bharne.jpg

पर्वती येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे "कोविड 19 ब्रिगेड सहायता कक्ष' सुरू 

राज्यमंत्री भरणे म्हणताहेत, राजकारण सोडून नागरिकांना सहकार्य करा

sakal_logo
By
अजित घस्ते

सहकारनगर (पुणे) : "पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या सर्वांनीच राजकारण सोडून त्या पलीकडे नागरिकांना सहकार्य करून कोरोनाशी लढा दिला पाहिजे. तसेच सरकारी नियमांचे पालन करून आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे असे, मत वनराज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले. 

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

राष्ट्रवादी कॉंग्रेस पर्वती मतदारसंघाच्यावतीने मित्रमंडळ चौक येथे कोविड 19 ब्रिगेड सहायता कक्षाचे उद्घाटन वनराज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. नागरिकांच्या मदतीसाठी "कोविड ब्रिगेड सहायता कक्ष राष्ट्रवादी पार्टीतर्फे सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पुणे शहरातील विविध ठिकाणच्या कोविड हॉस्पिटलची अद्ययावत माहिती, उपलब्ध बेड, टेस्टींगच्या सोयी, ऍम्ब्युलन्स, समुपदेशन केंद्र, इतर वैद्यकीय सोयी याबाबत माहिती देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रसंगी पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, नगरसेवक सुभाष जगताप, पर्वती विधानसभा अध्यक्ष नितीन कदम, कार्याध्यक्ष दिलीप अरुंदेकर, नगरसेवक प्रिया गदादे-पाटील, शिवाजी गदादे- पाटील, अमोल ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक नितीन कदम यांनी केले. तर डॉ. सुनीता मोरे यांनी आभार मानले. 

loading image