esakal | 'या' मंत्र्याने पीपीई कीट घातले अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

mi.jpg

कोविड योद्धा म्हणून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य व नगरपरिषद कर्मचारी, आशा स्वयंसेवीका, पोलीस, प्रशासनातील सर्वअधिकारी, पत्रकार यांच्या कार्याची मंत्री भरणे यांनी प्रशंसा केली.

'या' मंत्र्याने पीपीई कीट घातले अन्...

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : येथील कोविड केअर सेंटरमध्ये सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पीपीई की़ट घालून पाहणी केली. तसेच सेंटरमध्ये दाखल रुग्णांना मानसिक आधार दिला. त्यांना पिण्याचे पाणी, जेवण, औषध वेळेवर मिळते का याची चौकशी केली. तसेच येथील स्वच्छतेची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी कोविड योद्धा म्हणून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस,आरोग्य व नगरपरिषद कर्मचारी, आशा स्वयंसेवीका, पोलीस, प्रशासनातील सर्वअधिकारी,पत्रकार यांच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. तरकोविड वरून कोणीही राजकारण करू नये असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.

भरणे यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी,गटविकास
अधिकारी विजयकुमार परीट, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पोळ व पत्रकारांनी पीपीई किट घालून सर्व कोरोनाबाधीत रुग्णांशी सुसंवाद साधून त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

राज्यमंत्री भरणे म्हणाले, ''तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच इंदापूर कोविड केअर सेंटर वर येणारा अतिरिक्तताण लक्षात घेवून भिगवण येथे ५० व निमगाव केतकी येथे ३० खाटांचे कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करणार आहे. तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये.'' तालुक्यात १९५ रुग्ण कोरोना बाधित झाले असून पैकी  १०७ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत तर ७९ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. ९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या वतीने योग्य खबरदारी घेण्यात येत आहेत्यामुळेनागरिकांनी  घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन भरणे यांनी केले.