आश्रमशाळा प्रश्नांसाठीच्या आंदोलनाला पाठिंबा; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

संदेश शहा
Saturday, 12 September 2020

आश्रमशाळेच्या विविध मागण्या रास्त असून हे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतली आहे.

इंदापूर (पुणे) : आश्रमशाळेच्या विविध मागण्या रास्त असून हे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतली आहे. आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भिमाई आश्रमशाळेच्या वतीने विविध मागण्यांसाठी इंदापूर तहसील कार्यालयासमोर 5 सप्टेंबरपासून धरणे आंदोलन सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक, प्राचार्य व कर्मचारी हे संस्थेचे अध्यक्ष तथा इंदापूरचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहेत.

Breaking : राज्य सरकारने रेडी-रेकनरच्या दरात केली वाढ; सर्वाधिक पुणे जिल्ह्यात तर...

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून यासाठी सरकारने घालून दिलेले नियम व अटींचे पालन करत आंदोलन सुरू आहे. गतवर्षीचे अनुदान व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister of State Dattatraya Bharane says, support the agitation for ashram school issues