दिलीप वळसे पाटील म्हणतायेत, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी करणार प्रयत्न

डी. के. वळसे पाटील
Sunday, 27 September 2020


मंचर येथे मराठा क्रांती मोर्चा नेत्यांना ग्वाही 

मंचर (पुणे) : सर्वोच्च न्यायालयाची मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असली तरी आरक्षणामुळे मराठा समाजातील मुला-मुलींना जे लाभ होणार होते, ते सर्व लाभ देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहेत.

पुण्यातल्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली तरुणी सापडली

घटनापीठापुढे मराठा समाजाची भक्कम बाजू मांडली जाईल, अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. मंचर (ता. आंबेगाव) येथे रविवारी वळसे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वळसे पाटील यांना मागण्यांचे निवेदन मराठा मोर्चाचे समन्वयक अजय घुले, शरद पोखरकर,आशिष घोलप, वसंतराव बाणखेले, अमोल घोलप यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी वसंतराव भालेराव, जगदीश घिसे, दत्ता थोरात, दत्ता गांजाळे, राजाबाबू थोरात, कैलासबुआ काळे, अमोल शिंदे, बाजीराव बांगर, वैष्णवी गांजाळे उपस्थित होते. वळसे पाटील यांनी आंदोलकांबरोबर चर्चा केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister of State Dilip Walse Patil says efforts will be made to lift the moratorium on Maratha reservation