esakal | पुण्यातल्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली तरुणी सापडली
sakal

बोलून बातमी शोधा

 A missing girl was found from Covid Center in Pune

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर रुग्णना ठेवण्यासाठी शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात जम्बो कोविड सेंटर उभा करण्यात आले होते. सुरुवातीपासुनच वादग्रस्त ठरलेल्या या केंद्राविषयी 13 सप्टेंबर रोजी घडलेल्या एका घटनेने खळबळ उडवून दिली. ती घटना होती, जम्बोमध्ये उपचारासाठी दाखल केलेली 33 वर्षाची तरुणी गायब झाल्याची. ​

पुण्यातल्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली तरुणी सापडली

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे

पुणे : जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता  झालेली 33 वर्षाची मुलगी अखेर पोलिसांना सापडली आहे. ती मुलगी नेमकी कुठे होती, तिच्याबाबत काय घडले, ती अचानक बेपत्ता कशी झाली, या आणि अशा असंख्य प्रश्नाची उत्तरे तिच्याकडून मिळणार आहे. सध्या तरी तिचा जबाब घेण्याचे काम शिवाजीनगर पोलिसांकडुन सुरु आहे, अशी माहिती पुढे आली आहे. 

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर रुग्णना ठेवण्यासाठी शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात जम्बो कोविड सेंटर उभा करण्यात आले होते. सुरुवातीपासुनच वादग्रस्त ठरलेल्या या केंद्राविषयी 13 सप्टेंबर रोजी घडलेल्या एका घटनेने खळबळ उडवून दिली. ती घटना होती, जम्बोमध्ये उपचारासाठी दाखल केलेली 33 वर्षाची तरुणी गायब झाल्याची. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबाधित असलेली प्रिया गायकवाड या तरुणीला 29 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी तरुणीची आई रागिनी गमरे ( वय 53, रा. नागपुर चाळ) या त्यांच्या मुलीला घेण्यासाठी आल्या. त्यावेळी त्यांची मुलगी सापडत नसल्याचे तसेच संबंधित तरुणी तेथे उपचार करण्यासाठी दाखलच झाली नसल्याचे जम्बोतर्फे सांगण्यात आले. या घटनेनंतर गमरे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. 

दरम्यान, जम्बोकडुन गमरे व पोलिसांना योग्य उत्तरे मिळाली नाहीत. त्याचवेळी गमरे यांनी जम्बोसमोरच बेमुदत उपोषण सुरु करुन आपली मुलगी परत देण्याची मागणी केल्यानंतर या घटनेकडे सगळ्याचे लक्ष वेधले गेले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही या प्रकरणी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क साधुन घटनेचा तत्काळ तपास करण्याचे आदेश दिले.

आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी मुदतवाढ


शिवाजीनगर पोलिसांकडुन मुलीचा तपास वेगाने सुरु होता. त्यातच शनिवारी सकाळी मुलगी पोलिसांना सापडली. याविषयी " त्या मुलीला अजुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले नाही. तिचा जबाब घेतल्यानंतर तिच्याबाबत माहिती देण्यात येईल."
- बाळासाहेब कोपनर,वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे.

''तरूणीला उपचारानंतर ५ सप्टेंबरला घरी सोडण्यात आले होते. ती आता कुटुंबियांसोबत आहे. त्याची प्रकृतींची चौकशी केली असून ती पूर्णपणे बरी आहे. जंबोतील प्रत्येक रूग्णांकडे लक्ष दिले जाते. ''
- रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त। महापालिका

loading image
go to top