ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनो, आता 'स्वयं'चे कोर्स शिकता येणार मराठीत!

ब्रिजमोहन पाटील
रविवार, 28 जून 2020

- इंग्रजी भाषेतून मराठीत अनुवाद
- 40 कोर्सची निवड
- इतर सात भाषांमध्ये देशात काम सुरू

पुणे : पदवी प्राप्त करताना पूरक शिक्षणासाठी 'क्रेडीट कोर्स' करणे आवश्‍यक भाग बनत असताना, त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडत आहेत. या विद्यार्थ्यांना इंग्रजीसह त्यांच्या मातृभाषेतून हे शिक्षण मिळाल्यास त्यांना ही या प्रक्रियेत पुढे येता येईल, यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. देशात सर्वाधिक नोंदणी होणारे 40 क्रेडीट कोर्स मराठीसह आठ भाषांमध्ये अनुवादीत केले जात आहेत.

प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन; राज्य सरकारचा मोठा निर्णय

पदवीचे शिक्षण घेताना त्यांच्या ठरलेल्या अभ्यासक्रमापेक्षा अवांतर ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावे, विद्यार्थ्यांना क्रेडीट गुण देता यावेत, यासाठी 2016 पासून 'स्वयं' पोर्टलच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले. सध्या स्वयंवर 600 पेक्षा जास्त विविध प्रकारचे ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहेत. 'कोरोना'मुळे ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन दिले जात असल्याने त्याचा लाभ शहरी, ग्रामीण विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे, नगर, नाशिक या तीन जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक महाविद्यालये आहेत, येथील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!

अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेमुळे अडथळे येत असल्याने ते ऑनलाईन कोर्स करण्यासाठी पुढे येत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 'स्वयं'वर सर्वाधिक जास्त नोंदणी झालेले 40 अभ्यासक्रम आठ भाषांमध्ये अनुवादीत करण्याचे काम 'शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्रांना (ईएमआरसी) दिले आहे. त्यामध्ये मराठीत भाषांतरीत करण्याचे काम पुणे विद्यीपाठतील "ईएमआरसी' केद्रांत सुरू आहे. सुमारे दीड महिन्यात 30 ते 40 टक्के भाषांतराचे काम पूर्ण झाले आहे, असे "ईएमआरसी'चे निर्माता विवेक नाबर यांनी सांगितले.

पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!

आठ भाषांमध्ये अनुवाद
'स्वयं'चे 40 ऑनलाईन कोर्स मराठी, तमिळ, हिंदी, तेलुगू, गुजराथी, बंगाली यासह आठ भाषांमध्ये अनुवाद केला आहे. हे कोर्स संगणक विज्ञान, अन्न तंत्रज्ञान, व्यवस्थान, औषधनिर्माण, न्याय वैद्यक शास्त्र, भू शास्त्र, मास कम्युनिकेशन अँड मीडिया, मानसशास्त्र या विषयातील आहेत. या 40 पैकी बिझनेस इथिक्‍स, फायनान्स फॉर नॉन फायनान्स, पर्सनॅलिटी डेव्हलमेंट हे तीन कोर्स पुणे विद्यापीठाने तयार केलेले आहेत, असे समन्वयक श्रीकांत ठाकुर यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शिक्षण मातृभाषेत, उत्तर इंग्रजीत
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिकवलेले पूर्ण कळत नसल्याने त्यांना ऑनलाईन कोर्स मराठीतून शिकवले जाणार आहेत. त्यामुळे त्यांची संकल्पना स्पष्ट होईल. पण त्यांना या क्रेडीट कोर्सची परीक्षा देताना इंग्रजीतून पेपर लिहावे लागणार आहे. मात्र, देशभरात यावर गेल्या दीड महिन्यापासून काम सुरू असल्याने, हे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ministry of HRD has commissioned the EMRC to translate the 40 most registered courses on Swayam into eight languages