

अल्पवयीन मुलीवर अत्याचार;
मंगळवेढ्यात तरुणाविरुद्ध गुन्हा
मंगळवेढा, ता. ८ : ग्रामीण भागातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला ‘तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण दोघे फिरायला जाऊ,’ अशी बतावणी करून सांगोला येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अजित पांडुरंग माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच ही घटना कोणास सांगितल्यास तुला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पीडिता दहावीच्या वर्गात शिकत असून, आरोपी तिचा नेहमी पाठलाग करीत होता. त्याने तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. पीडितेने नकार दिल्यानंतर आरोपीने ‘मित्र म्हणून बोलत जाऊ,’ असे सांगून तिच्याशी संपर्क ठेवला.
६ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास पीडिता शाळेत जात असताना आरोपी स्कुटीवरून तेथे आला. ‘आपण फिरायला जाऊ,’ असे सांगून त्याने तिला सोबत घेतले. सांगोला येथे नेल्यानंतर लॉजवर जाण्यास पीडितेने नकार देऊन घरी सोडण्यास सांगितले. मात्र, आरोपीने तिला जबरदस्तीने लॉजवर नेऊन अत्याचार केला. दुपारी अडीचच्या सुमारास त्याने पीडितेला घराजवळ सोडताना कोणाला सांगितल्यास तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. घडलेला प्रकार पीडितेने वडिलांना सांगितल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.