Crime News: दौंड शहरात अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकराचा कोयत्याने निर्घृण खून केला. खूनानंतर तो स्वतः पोलिस ठाण्याकडे निघाला होता. पोलिसांनी अर्ध्या रस्त्यात त्याला ताब्यात घेतले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दौंड : दौंड शहरात एका अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकराचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. खून केल्यानंतर तो स्वतः पोलिस ठाण्याकडे पायी निघाला होता.