दागिन्यांसह अपहरण केलेली अल्पवयीन मुलगी परतली घरी; कोंढवा पोलिसांची कामगिरी!

The minor girl returned home who was abducted with jewelry with the help of Kondhwa police
The minor girl returned home who was abducted with jewelry with the help of Kondhwa police

पुणे  : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्याचा कोंढवा पोलिसांनी तात्काळ छडा लावला आहे. मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीने संबंधित मुलीला फुस लावून घरातील दागिने घेऊन बोलावले होते. हे दागिने त्याने एका सराफाकडे गहाण ठेवले होते.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

विनोद राजू सोनवणे (वय 29, रा. भिमनगर, कोंढवा खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान कोंढवा पोलिस ठाण्यातील दिपक क्षिरसागर यांना आरोपी मुलीला घेऊन समता नगर येथे उभा असल्याची खबर मिळाली. त्यानूसार एक पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यावेळी मुलगी तेथे नव्हती. आरोपीकडे मुलीसंदर्भात विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने मुलीला ब्युटी पार्लरचा व्यवसाय टाकण्याचे आमिष दाखवून पळवून आणल्याचे सांगितले.

पुणे : पूर्व हवेलीत कोरोनाचे थैमान; उपचारासाठी धावण्याची वेळ​

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलिस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिंदे, सहायक पोलिस फौजदार ईक्‍बाल शेख, पोलिस हवालदार सुरेश भापकर, पोलिस नाईक गणेश आगम, पोलिस शिपाई दिपक क्षिरसागर यांच्या पथकाने केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दागिने गहाण ठेऊन घरखर्च :
आरोपीने अल्पवयीन मुलीला ब्युटी पार्लरचा व्यवसाय करण्यासाठी घरातून येताना आईचे दागिने चोरुन आणण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे मुलीने त्याला दागिने आणून दिल्यावर त्याने ते एका सराफाकडे गहाण ठेऊन पैसे घेतले होते. या पैशातून त्याला स्वत:चा उदरनिर्वाह चालवायचा होता. तो सध्या बेरोजगार आहे. उत्पन्नाचा काही मार्ग नसल्याने त्याने हा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com