esakal | एकतर्फी प्रेमातुन अल्पवयीन मुलीचा खुन; शीर धडापासून झाले वेगळे | Murder
sakal

बोलून बातमी शोधा

Murder
एकतर्फी प्रेमातुन अल्पवयीन मुलीचा खुन; शीर धडापासून झाले वेगळे

एकतर्फी प्रेमातुन अल्पवयीन मुलीचा खुन; शीर धडापासून झाले वेगळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बिबवेवाडी - कबड्डीपटू असलेली अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रीणींसमवेत कबड्डीचा सराव करीत असतानाच तिच्या नात्यातील मुलाने व त्याच्या साथीदारांनी तिच्या गळ्यावर कोयत्याने वार करून तिचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी बिबवेवाडी येथे घडला. या घटनेत अक्षरशः मुलीचे शीर अक्षरशः धडापासून वेगळे झाले होते.अंगावर धरकाप उडविणाऱ्या या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेजण ताब्यात घेण्यात आले आहेत.

क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14, रा. बिबवेवाडी) असे खुन झालेल्या मुलीचे नाव आहे. तर ऋषिकेश उर्फ शुभम बाजीराव भागवत (वय 21, रा. लोहम, खंडाळा, सातारा), त्याचे दोन साथीदार व अन्य दोघे अशा पाच जणांविरुद्ध अशा तिघांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. क्षितीजा हि आठवीत शिकत होती, त्याचबरोबर ती कबड्डी खेळाडूही होती. नेहमीप्रमाणे ती तिच्या काही मैत्रीणींसमवेत मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी येथील यश लॉन्स परिसरामध्ये कबड्डीचा सराव करीत होती. त्यावेळी शुभम व त्याचे दोन साथीदार तेथे आले. मुली सराव करीत असतानाच, शुभमने क्षितीजाला खेळातून बाहेर ओढले. त्यानंतर त्याने त्याच्याकडील कोयत्याने क्षितीजाच्या गळ्यावर वार केले. त्याचबरोबर त्याच्या मित्रांनी देखील त्यांच्याकडील शस्त्रांनी वार केले.या हल्ल्यामध्ये क्षितीजाचे शीर धडापासून वेगळे झाले होते. या घटनेनंतरही क्षितीजाच्या मैत्रीणींनी आरोपीला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडील शस्त्रे, पिस्तुल मुलींवर रोखले. मात्र त्याला गोळीबार करता आला नाही. या घटनेमुळे परिसरातील नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरली.

हेही वाचा: देश्ना नाहरचे एकाचवेळी स्केटिंगमध्ये नऊ विक्रम

मुली कबड्डीचा सराव करीत असतानाच पोलिसांचे गस्तीवरील वाहन तेथून गेले होते. त्यानंतर काही वेळातच हि घटना घडली. शुभम हा क्षितीजाचा दूरचा नातेवाईक आहे. या घटनेनंतर परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करून आरोपींना पकडण्याच्या सुचना दिल्या आहेत.

'अल्पवयीन मुलगी व तिच्या चार मैत्रीणी कबड्डी खेळत होत्या. त्यावेळी तिचा दुरचा नातेवाईक असलेल्या मुलाने व त्याच्या साथीदारांनी मुलीवर कोयत्याने वार करून तिचा खुन केला. एकतर्फी प्रेमातुन खुनाची घटना घडली आहे. मुख्य तिघेजण व अन्य दोघे असे पाच संशयित आहेत. त्यापैकी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.'

- नम्रता पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ पाच.

loading image
go to top