

Police Register Case After Minor Opens Fire in Pune
Esakal
पुण्यातील गुलटेकडी परिसरात अल्पवयीन मुलाकडून गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेमुळे खळबळ उडालीय. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास गुलटेकडी इथं गोळीबार झाला. गोळीबार करणारा अल्पवयीन असून तो सराईत गुन्हेगार असल्याचंही समोर आलंय. सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झालेलं नाहीय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.