

naval kishor ram
sakal
पुणे - पुणे शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ स्पर्धेसाठी रस्त्यातील अडथळे दूर करणे, अतिक्रमण काढणे, रस्ते चांगले करणे या सुधारणांमुळे गेल्या महिन्याभरात वाहतुकीचा वेग १० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आगामी काळात हा वेग आणखी वाढावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, किरकोळ कामांकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.