
नारायणगाव : चवताळलेल्या नागाने तरुण शेतकऱ्यांच्या हाताला दोन ठिकाणी दंश केला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल होताच हृदयविकाराचा झटका आला. रक्तदाब कमी होऊन श्वास बंद पडलेल्या तरुण शेतकऱ्याला येथील विघ्नहर मेडिकल फाउंडेशन रुग्णालयात तातडीची उपचार सुविधा मिळाल्याने त्याला जीवदान मिळाले. डॉक्टरच्या रूपात आम्हाला देव भेटण्याची भावना यावेळी रुग्णाच्या नातेवाइकांनी व्यक्त केली.