Sakal Misal Utsav : ‘सकाळ’ मिसळ उत्सवाला उद्यापासून प्रारंभ

कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिक मिसळ, दही मिसळ, नादखुळा मिसळ, गुजराती मिसळ, फराळी मिसळ या आणि त्याहून अधिक प्रकारच्या मिसळची चव खवय्ये पुणेकरांना एकाच ठिकाणी चाखता येणार आहे.
misal utsav initiative by sakal for foodie people from 26 to 28 april at pune kothrud mhatre bridge
misal utsav initiative by sakal for foodie people from 26 to 28 april at pune kothrud mhatre bridgeSakal

पुणे : कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिक मिसळ, दही मिसळ, नादखुळा मिसळ, गुजराती मिसळ, फराळी मिसळ या आणि त्याहून अधिक प्रकारच्या मिसळची चव खवय्ये पुणेकरांना एकाच ठिकाणी चाखता येणार आहे.

त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ने आयोजित केलेल्या मिसळ महोत्सवाला शुक्रवारी (ता. २६) प्रारंभ होत आहे. रविवारपर्यंत (ता. २८) हा तीन दिवसांचा ‘मिसळ उत्सव’ खाद्यप्रेमींसाठी रंगणार आहे.

मिसळ पाव कडधान्याची रस्सा असलेली, उसळ, पोहे, त्यावर भेळ व फरसाण घालून पावासोबत खाल्ला जात असलेला पदार्थ. हा पदार्थ तसा आधुनिक पाककृती आहे. परंतु मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे प्रसिद्ध आहे. तसेच मिसळ हा महाराष्ट्राचा खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.

मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे भुकेच्या वेळी अस्सल खवय्यांना मिसळ आठवतेच. त्याशिवाय मित्रमंडळींना एकत्र जमवण्यासाठीही मिसळ हेच निमित्त असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यात सर्व वयोगटातील लोकांना सहभागी होता येईल. किमान १२ हजारांहून अधिक नागरिक या मिसळ उत्सवाला भेट देतील, अशी अपेक्षा आहे.

मिसळची चव आणि ती बनवण्याची पद्धत दर ४० मैलावर बदलत जाते. अनेक जण त्यात विविध प्रकारचे पाककृती प्रयोग करून त्याची लज्जत वाढवितात. अशा विविध प्रकारच्या मिसळ यानिमित्ताने एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. राज मसाले आणि अक्कुदास ट्रेडिंग, हे या उत्सवाचे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत. तर केळकर हाउसिंग हे रिअल इस्टेट आणि ऑटो पार्टनर ‘नमःशिवाय हिरो’ हे आहेत.

हे लक्षात ठेवा

  • कधी - २६, २७ आणि २८ एप्रिल

  • कुठे - बोगनवेल फार्म, डी. पी. रस्ता, म्हात्रे पुलाजवळ, पुणे

  • वेळ - सकाळी ९ ते रात्री ९

  • पार्किंग - मोफत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com