पिंपरी : स्कूल बसमध्ये विद्यार्थिनीशी अश्‍लिल चाळे; चालकावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

- स्कूल बसमध्ये विद्यार्थिनीशी अश्‍लील चाळे केल्याप्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल

पिंपरी : स्कूल बसमध्ये विद्यार्थिनीशी अश्‍लील चाळे केल्याप्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरीतील इंद्रायणीनगर येथे घडली. याप्रकरणी 15 वर्षीय विद्यार्थिनीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिलीप पांडुरंग काळे (वय 24, रा. चिंबळी) याच्यावर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काळे हा इंद्रायणीनगर येथील एका शाळेचा बसचालक आहे. शनिवारी (ता. 14) विद्यार्थिनीला आणण्यासाठी काळे हा बस घेवून विद्यार्थिनीच्या घरासमोर गेला. बसमध्ये विद्यार्थिनीशी अश्‍लिल वर्तन केले.

आणखी वाचा - अमितभाई मातोश्रीवर जाणार होते; फडणवीसांचा खुलासा

तसेच शाळेच्या बाहेर बस उभी असताना देखील काळे याने विद्यार्थिनीशी अश्‍लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला. यासह तिच्या पालकांना जिवे मारण्याची धमकी दिली. भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Misbehave with Girl Student in Bus in Pimpri