

Audacious Theft: Miscreants Steal Bait from Leopard Trap in Narodi
Sakal
घोडेगाव : नारोडी (ता. आंबेगाव) येथील चाफमळा वस्तीवर बिबट्याला पकडण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार वन विभागाने दोन महिन्यापासून पिंजरा लावला होता. बिबट्याला भक्ष म्हणून दोन कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. परंतु या कोंबड्याच अद्याप चोरट्याने पिंजऱ्यातून काढून घेतल्या असल्याची घटना घडली आहे. याचा नागरिकांनी तीव्र संताप व निषेध व्यक्त केला आहे.