सूसनमधील कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह पण खाजगी प्रयोगशाळेत तोच रिपोर्ट पॉझिटिव्ह

सूसनमधील कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह पण खाजगी प्रयोगशाळेत तोच रिपोर्ट पॉझिटिव्ह

उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील एका राजकीय महिला पदाधिकाऱ्याचा कोरोना संसर्ग तपासणीसाठी घेतलेला स्वॅब (घशातील द्रव) चा तपासणी अहवाल सलग दोन वेळा चुकीचा दिल्याच्या आरोपावरुन, पुणे शहरातील एका खाजगी प्रयोगशाळेच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात शुक्रवारी (ता. १२) रात्री उशीरा लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था, ससून रुग्णालयाच्या प्रयोगशाळेसह हडपसर येथील खाजगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेनेही, उरुळी कांचन येथील एका राजकीय महिला पदाधिकाऱ्याच्या स्वॅबचा अहवाल तब्बल पाचवेळा निगेटीव्ह असल्याचे दिला होता. तर दुसरीकडे कोरोना चाचणीसाठी पुणे महानगरपालिकेशी टायअप असणाऱ्या पुणे शहरातील खाजगी प्रयोगशाळेने मात्र त्याच महिलेचे स्वॅब रिपोर्ट दोन वेळा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिला होता. शासकीय प्रयोगशाळा निगेटीव्ह अहवाल देत असताना, खाजगी प्रयोगशाळा मात्र तोच अहवाल पॉझिटीव्ह देत असल्याने, संबधित महिला पदाधिकाऱ्यांच्या मुलाने लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, लोणी काळभोर पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी, उरुळी कांचन येथील महिला राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांकडून पुणे शहरातील एका खाजगी प्रयोगशाळेच्या विरोधात पोलिसात लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु करण्यात येणार असून, चौकशीत पुणे येथील खाजगी प्रयोगशाळेची चूक आढळल्यास प्रयोगशाळेच्या व्यवस्थापनाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे बंडगर यांनी स्पष्ट केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

उरुळी कांचन येथील एका राजकीय महिला पदाधिकाऱ्याला कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्याने, कोरोनाच्या तपासणीसाठी महिलेचा स्वॅब (घशातील द्रव) सोमवारी (ता. ८) हडपसर व पुणे शहरातील दोन खाजगी प्रयोगशाळेत पाठवले होते. मात्र, दोन्ही प्रयोगशाळेचे तपासणी अहवाल परस्परविरोधी आल्याने, संबधित महिलेचा स्वॅब पुन्हा एकदा गुरुवारी (ता. ११) रोजी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठवला होता. या प्रयोगशाळेचा अहवाल निगेटिव्ह आल्याने महिलेला कोरोना निगेटिव्ह म्हणून जाहीर केले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मात्र, एक प्रयोग म्हणून याच महिलेचा स्वॅब गुरुवारी दुपारी नायडू, ससून रुग्णालयाची प्रयोगशाळा हडपसर येथील खाजगी प्रयोगशाळेसह पुणे शहरातील प्रयोगशाळेत पाठवला होता. याही वेळेस पुणे शहरातील प्रयोगशाळा वगळता, वरीच चार प्रयोगशाळांनी आपआपले अहवाल निगेटिव्ह दिले. तर खाजगी प्रयोगशाळेने मात्र आपला अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह दिला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याबाबत 'सकाळ'शी बोलताना उरुळी कांचन येथील संबंधित महिलेचा मुलगा म्हणाला, शासकीय प्रयोगशाळेचे अहवाल निगेटीव्ह येत असताना, पुणे शहरातील खाजगी प्रयोगशाळेचा अहवाल दोनदा पॉझिटिव्ह येतो ही बाब चिंताजनक व खाजगी प्रयोगशाळांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. याचा फार मोठा मानसिक त्रास आमच्या कुटुंबाला झालेला आहे. यासाठी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दखल न घेतल्यास, मात्र न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागणार आहे. 

प्रयोगशाळा व्यवस्थापनाकडे तक्रार

दरम्यान, उरुळी कांचन येथील महिला पदाधिकाऱ्यावर उपचार करणाऱ्या विश्वराज हॉस्पिटल या खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाने, चुकीचा अहवाल दिल्याच्या आरोपावरुन प्रयोगशाळा व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार केली आहे. याबाबतची माहिती विश्वराज हॉस्पिटलचे वरिष्ठ अधिकारी डॉ. पी. के. देशमुख यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com