Breaking : बेपत्ता व्यावसायिक गौतम पाषाणकर सापडले

Missing businessman Gautam Pashankar has been found
Missing businessman Gautam Pashankar has been found

पुणे : तब्बल एक महिन्यापासून बेपत्ता असलेले नामांकित व्यावसायिक गौतम पाषाणकर यांचा अखेर पुणे पोलिसांनी शोध घेतला. पाषाणकर सुखरुप असून त्यांना जयपुरच्या एका हॉटेलमधून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शोधून काढले. पथकाकडून त्यांना पुण्याला त्यांच्या घरी आणले जात आहे. 

ऑटोमोबाईल व बांधकाम क्षेत्रात चांगले नाव असलेले व्यावसायिक पाषाणकर हे 21 ऑक्‍टोबरपासून पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयासमोरुन बेपत्ता झाले होते. त्यांच्या मुलाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविल्यानंतदर शिवाजीनगर पोलिसांसह नजीकच्या सर्व पोलिस ठाण्यांकडून त्यांचा कसून शोध घेण्यास सुरूवात झाली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पाषाणकर हे 21 ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. पाषाणकर हे लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा चालकाकडे दिला आणि हे घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला. त्यानंतर पाषाणकर ऑफिस मधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. गौतम पाषाणकर घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलीस स्थानकात धाव घेतली. तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचं आढळून आलं. मागील काही दिवसापासून व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी त्यात लिहिलं आहे. यानंतर तपासाचा वेग वाढवला असून विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे. 

दरम्यान, पाषाणकर यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांनी बेपत्ता झालेल्या पाषाणकर यांच्या तपासाला गती मिळावी, यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले होते. पोलिस आयुक्त गुप्ता यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाषाणकर यांच्या शोधाकडे लक्ष्य केंद्रीत करण्यात आले होते. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील तीन ते चार पथके पाषाणकर यांचा महाराष्ट्र, गोवा येथे तपास करीत होते.

राज ठाकरे म्हणाले,' तु तुझा प्रचार कर, बाकी मी बघतो'

दरम्यान, मागील आठवड्यात पाषाणकर हे कोल्हापूर येथील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांची पथके कोल्हापुर, रत्नागिरी येथे त्यांचा शोध घेण्यासाठी गेली होती. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनीट एकचे पथकही पाषाणकर यांचा शोध घेत होते.

तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांना पाषाणकर हे राजस्थानमधील जयपुर शहरामधील एका हॉटेलमध्ये वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, युनीट एकच्या पथकाचे पोलिस निरीक्षक ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांच्या पथकाने जयपुरमध्ये पाषाणकर यांचा शोध घेतला. ते एका हॉटेलमध्ये त्यांना मिळून आले. त्यानंतर पथकाकडून त्यांना पुण्याला घेऊन येण्यास सुरूवात झाली आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"माझे वडील सुखरुप असून पुणे पोलिसांनी त्यांना शोधून काढले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह, युनीट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ताकवले व युनीट एकचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टाचे हे फळ आहे. वडील बेपत्ता झाल्याने गेले एक महिना आम्ही तणावाखाली होतो, आता आमच्या घरात दिवाळी साजरी होईल. वडीलांचे आरोग्य खराब झाले असून त्यांना आता मानसिक आधाराचीही गरज आहे. त्यादृष्टीने आमचे कुटुंब प्रयत्न करेल.''
- कपिल पाषाणकर, गौतम पाषाणकर यांचे पुत्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com