पुणे : जम्बो कोविड सेंटरमधली तरुणी पिरंगुटच्या घाटात पोहोचली कशी?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

प्रिया गायकवाड या युवतीला २९ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता ससून रुग्णालयातून जम्बो केंद्रात दाखल केले होते. मात्र १३ सप्टेंबर रोजी प्रिया जम्बोमध्ये नसल्याची माहिती तेथील डॉक्‍टारांनी तिची आई रागिनी गमरे (वय ५३, रा. नागपूर चाळ) यांना दिली.

पुणे  : जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेली ३३ वर्षांची युवती तिच्या नातेवाईक व पोलिसांना पिरंगुटच्या घाटामध्ये पायी जाताना आढळून आली. पोलिस, महापालिका व जम्बो व्यवस्थापनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला. तरीही तिला जम्बोतून कधी सोडण्यात आले, तिच्यावर कोणते उपचार केले, तिला कोणत्या नातेवाईकाच्या ताब्यात  देण्यात आले, तेथून बाहेर पडून युवती पिरंगुट घाटापर्यंत पोचली कशी? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे अद्यापही मिळू शकली नाहीत.

पुण्यातल्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली तरुणी सापडली

प्रिया गायकवाड या युवतीला २९ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता ससून रुग्णालयातून जम्बो केंद्रात दाखल केले होते. मात्र १३ सप्टेंबर रोजी प्रिया जम्बोमध्ये नसल्याची माहिती तेथील डॉक्‍टारांनी तिची आई रागिनी गमरे (वय ५३, रा. नागपूर चाळ) यांना दिली. रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहूल डंबाळे यांच्यासमवेत यावरून बेमुदत उपोषण सुरू केले होते. या प्रकारानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न 
केला.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The missing girl from Jumbo was found in Pirangut ghat