
पुणे : पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून लाखो रुपयांचे साहित्य गायब झाल्याचे समोर आल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी शहर अभियंत्यांवर जबाबदारी टाकली आहे. मात्र, या चौकशीला अजूनही गती आलेली नाही. त्यामुळे ही चौकशी किती दिवसात पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.