दारुसाठी पैसे मागितले म्हणून केला खून; तरुण बेपत्ता होण्यामागचं गूढ उकललं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Junnar_Murder

जुन्नर पोलिसांचे पथक तसेच लोणावळा येथील एक पथक खोल दरीत गणपतचा शोध घेत होते.

दारुसाठी पैसे मागितले म्हणून केला खून; तरुण बेपत्ता होण्यामागचं गूढ उकललं

जुन्नर (पुणे) : शिवली (ता. जुन्नर) येथील बेपत्ता झालेल्या आदिवासी तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे गणपत काशीनाथ आढारी (वय ३७, रा. शिवली, ता. जुन्नर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मित्रांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. या कारणावरून वाद झाला आणि दोन मित्रांनी आपल्या मित्राचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून त्याला जीवे ठार मारले.  

त्यानंतर मित्राच्या चारचाकी गाडीतून मृतदेह दुर्गम आदिवासी भागातील हातविज येथील खोल दरीमध्ये फेकून दिला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले, अशी माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली असून जुन्नर पोलिसांनी या खून प्रकरणी गणेश धर्मा मुठे (वय ३२), दीपक गेनभाऊ कोरडे (वय १९), अमोल विठ्ठल लांडे (वय २१, तिघे रा. माणकेश्वर, ता. जुन्नर) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Breaking : अपघाताची मालिका सुरूच; पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात​

गणपत आढारी हा मंगळवार (ता.९) पासून बेपत्ता असल्याची तक्रार जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. गणपत आढारी, गणेश मुठे, दीपक कोरडे हे तिघेजण जुन्नरमधील वाईन शॉप लगत गप्पा मारीत होते. यावेळी गणपतने दारू पिण्याकरिता गणेशकडे पैसे मागितले. त्यावरून दोघात वाद झाला. त्यानंतर आपटाळे खिंडीजवळ एका शेतात गप्पा मारत असताना या तिघांत पुन्हा वाद झाल्याने गणेश आणि दीपक या दोघांनी गणपतचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून त्याला जीवे ठार मारले. त्यानंतर बुधवारी (ता.१०) अमोल लांडेच्या चारचाकीमधून गणपतचा मृतदेह हातविज येथील खोल दरीत फेकून दिला.

बारामती : कुंपनानंच शेत खाल्लं! ATMमध्ये भरण्यासाठी दिलेले ३ कोटी केले लंपास

जुन्नर पोलिसांचे पथक तसेच लोणावळा येथील एक पथक खोल दरीत गणपतचा शोध घेत होते. दोन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर रविवारी (ता.१४) मृतदेह खोल दरीत मिळून आला. जुन्नर पोलिसांनी तातडीने हालचाल करून या घटनेतील तीन आरोपींना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सचिन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास जाधव, अंमलदार वाल्मिक शिंगोटे करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Web Title: Missing Tribal Youth Shivli Junnar Has Been Found Murdered

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top