बारामती : कुंपनानंच शेत खाल्लं! ATMमध्ये भरण्यासाठी दिलेले ३ कोटी केले लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ATM

कंपनीच्या बारामती शाखेने रक्कम भरण्यासाठी दोन मार्ग निश्चित केले आहेत. या मार्गावर वेगवेगळ्या 54 एटीएम केंद्रावर रक्कम भरली जाते. त्यासाठी संबंधित एटीएमचे अॅडमिन कार्ड, पासवर्ड व अन्य साधने कर्मचाऱायंना दिली जातात.

बारामती : कुंपनानंच शेत खाल्लं! ATMमध्ये भरण्यासाठी दिलेले ३ कोटी केले लंपास

बारामती (पुणे) : एटीएम केंद्रामध्ये भरायला दिलेल्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी बारामतीत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 कोटी 2 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. विविध बँकांच्या एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली रक्कम न भरता परस्पर अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. 

पूजाच्या हत्येचा कट? रूम भाड्याचा करार ते आत्महत्या; घटनाक्रमामुळे संशय

या प्रकरणी नितीन बापू चव्हाण, अमरसिंह ज्ञानदेव पवार, महेश शिवाजी पवार (तिघे रा. को-हाळे खुर्द, ता. बारामती), अभिषेक चंद्रकांत खरात व स्वप्निल दिनकर आगम ( दोघे रा. कसबा, बारामती), विक्रम सुनील भोसले (रा. निरावागज, ता. बारामती) व राजेंद्र बारकू जोगदंड (रा. आर्वी, ता. दौंड)  अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

याबाबत शहर पोलिस ठाण्यात सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड ( खराडी, पुणे) कंपनीचे शाखाधिकारी संदीप सुधाकर केतकर (रा. एरंडवणे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.  ही कंपनी विविध बॅंकांच्या एटीएममध्ये रक्कम भरण्याचे काम करते. 

'...तर मी नंगा नाच करेन'; असं का म्हणाले विजय शिवतारे?

कंपनीच्या बारामती शाखेने रक्कम भरण्यासाठी दोन मार्ग निश्चित केले आहेत. या मार्गावर वेगवेगळ्या 54 एटीएम केंद्रावर रक्कम भरली जाते. त्यासाठी संबंधित एटीएमचे अॅडमिन कार्ड, पासवर्ड व अन्य साधने कर्मचाऱायंना दिली जातात. 14 ऑक्टोबर 2020 रोजी बारामतीतील एका एटीएम केंद्रात 50 हजार रुपयांची रक्कम कमी असल्याचे आढळून आल्यानंतर कंपनीने सर्व केंद्रांचे लेखापरीक्षण केले. 8 फेब्रुवारीच्या लेखापरीक्षणातही गडबड झाल्याचे कंपनीच्या लक्षात आले. त्या नंतर सखोल चौकशी केली असता एका मार्गावर सुमारे 1 कोटी 63 लाख तर दुस-या मार्गावर सुमारे 1 कोटी 39 लाख अशी 3 कोटी 2 लाख रुपये रक्कम कमी असल्याचे लक्षात आले. 

संबंधित एटीएमला खोट्या नोंदी करत कॅश बॅलन्सिंग रिपोर्टमध्ये त्या रकमा दाखवत आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी या रकमा वापरत सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Web Title: Embezzlement Rs 3 Crore Without Paying Atm Center Case Registered Against 7 Persons

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BankBaramati