कात्रज : ‘आमची आई शोधून द्या’, ‘आमची मुलगी शोधून द्या’ असे म्हणत प्रज्ञा किरण मारणे (वय ३५) या बेपत्ता महिलेच्या नातेवाइकांनी मंगळवारी (ता. १) पुणे पोलिस आयुक्तालयाबाहेर आंदोलन केले. .मारणे या पाच जूनपासून बेपत्ता आहेत. दाढ दुखत असल्याने उपचारासाठी त्या भारती हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. उपचार घेतल्यानंतर घरी येत असल्याची माहिती त्यांनी कुटुंबीयांना फोनवर दिली. मात्र, त्या घरी परतल्याच नाहीत. तेव्हापासून त्या बेपत्ता आहेत. त्यानंतर नातेवाइकांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. .परंतु, पोलिस तपास करत नसल्याचा आरोप मारणे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. गेल्या २५ दिवसांपासून त्या बेपत्ता आहेत. त्यामुळे मारणे यांची लहान मुले, आई आणि नातेवाइकांनी पोलिस आयुक्तालयाबाहेर आंदोलन केले. ‘आमची आई, मुलगी, बहीण परत कधी मिळणार?’ अशा प्रकारचे पोस्टर त्यांनी हातात घेतले होते..माझी पुतणी मागील २५ दिवसांपासून कात्रज चौकातून बेपत्ता झाली आहे. यासंदर्भात आम्ही भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. परंतु, अद्याप काहीही ठोस तपास पोलिसांनी केलेला नाही. आम्ही स्वतः संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. सार्वजनिक ठिकाणी पोस्टरही लावले. माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक लाखाचे बक्षिसही जाहीर केले. वृत्तपत्रातून अनेक तालुक्यांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या, तरीही तपास लागला नाही..त्यामुळे हताश होऊन मुलीची आई, दोन मुले, पती, सासू-सासरे, दोन भाऊ यांनी आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांची भेट झाली नाही. सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांची भेट घेत संपूर्ण माहिती दिली. १० जुलैपर्यंत तपास लागला नाही; तर आम्ही मुंबईत पावसाळी अधिवेशनात जाऊन आंदोलन करू, असे मारणे यांच्या नातेवाईक स्वाती ढमाले यांनी सांगितले..या प्रकरणाची पूर्णपणे माहिती घेतली आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरिक्षकांना सूचना दिल्या असून पुढील तपास सुरू केला आहे. लवकरच महिलेचा शोध लागेल.- रंजनकुमार शर्मा, पोलिस सहआयुक्त.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.