esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’

कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ‘मिशन कवच कुंडल अभियानास’ प्रारंभ करण्यात आला आहे. दसऱ्यापर्यंत जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी तालुकास्तरावर टास्क फोर्सच्या बैठका आयोजित करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने लसीकरण करण्याची जबाबदारी पार पाडावी. या मोहिमेसाठी इतर सर्व विभागांचा सहभाग घेण्यात यावा. कोणत्याही परिस्क्षितीत मनुष्यबळाअभावी लसीकरण मोहिम पार पाडण्यास अडचण येणार नाही, याची जबाबदारी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांवर राहील.

पिंपरी-चिंचवड शहरात ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत सलग ७५ तास लसीकरण मोहीम राबविण्यात आली. पुणे शहरातील कमला नेहरु रुग्णालय आणि सुतार रुग्णालय याठिकाणी सलग ७५ तास लसीकरण मोहीम ५ ऑक्टोबरपासून सुरू आहे. तर, पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रात स्त्री रुग्णालय बारामती, उपजिल्हा रुग्णालय दौंड, ग्रामीण रुग्णालय चाकण, प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली, खडकवासला, लोणीकाळभोर व उपकेंद्र हिंजवडी या सात ठिकाणी सलग ७५ तास लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा: मुसळधार पावसामुळे पुणे तुंबले

अंमलबजावणीची सप्तपदी :

 • सलग ७५ तास कोविड लसीकरण

 • एकाच दिवशी पाच लाख लसीकरणाचे विक्रमी उद्दिष्ट्य

 • कोविड लसीकरण आपल्या दारी

 • ध्येय महिलांच्या शंभर टक्के लसीकरणाचे

 • शंभर टक्के लसीकरण, दुसरा डोससाठी प्राधान्य

 • खासगी संस्क्षाचा सक्रिय सहभाग

 • कोविड लसीकरणाचे पूर्ण संरक्षित गाव

जिल्ह्यात ६ ऑक्टोबर २०२१ अखेर स्क्षिती :

 • १ कोटी ९ लाख २३ हजार १३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण

 • पुणे महापालिका : ४७ लाख ३ हजार १५४

 • पिंपरी-चिंचवड महापालिका : २० लाख ५७ हजार २०

 • पुणे ग्रामीण : ४१ लाख ६२ हजार ८३९ लसीकरण पूर्ण

 • पहिला डोस : ७३ लाख १७ हजार ४३८ नागरिकांना (८८ टक्के)

 • दुसरा डोस : ३६ लाख ५ हजार ५७५ नागरिकांना (४९ टक्के)

‘मिशन कवच कुंडल’मध्ये जिल्ह्यात मंगळवारी (ता. १२) सकाळी सात ते १२ या वेळेत विक्रमी पाच लाख लसीकरणाचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यात येणार आहे. लसीकरणाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्क्षांना पुरस्कार देण्यात येतील. तसेच, पूर्ण संरक्षित झालेल्या गावांमधील सरपंच आणि ग्रामसेवकांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

loading image
go to top