esakal | ‘वेट लॉस’चा रंजक प्रवास 
sakal

बोलून बातमी शोधा

mission-possible-book

‘वेट लॉस’ हा रंजक आणि प्रेरणादायी प्रवास, त्यामुळे हे पुस्तक म्हणजे ‘दीक्षित डाएट’चं ‘वर्कबुक’ आहे,’’ अशा शब्दांत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी पुस्तकाचे वर्णन केले. 

‘वेट लॉस’चा रंजक प्रवास 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘‘वजन कमी करण्याचा प्रमाणिक प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाशी हे पुस्तक एकरूप होते. मनाचा ठाव घेणारे हे पुस्तक असून, त्यात उपदेशाचा सूर नाही किंवा सल्ल्याची भाषा नाही. यात आहे तो फक्त ‘वेट लॉस’ हा रंजक आणि प्रेरणादायी प्रवास, त्यामुळे हे पुस्तक म्हणजे ‘दीक्षित डाएट’चं ‘वर्कबुक’ आहे,’’ अशा शब्दांत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी पुस्तकाचे वर्णन केले. 

सुप्रिया वकील लिखित ‘मिशन पॉसिबल’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. ‘सकाळ प्रकाशन’तर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या वेळी सुप्रिया वकील, शिवानी वकील, ‘सकाळ’ व्यवस्थापनाचे आशुतोष रामगीर आणि ऐश्‍वर्या कुमठेकर उपस्थित होते.  

डॉ. दीक्षित म्हणाले, ‘‘दीक्षित डाएट लोकांपर्यंत पोचत आहे; पण त्याचे ‘डॉक्‍युमेंटेशन’ होणं आवश्‍यक होतं. हा डाएट करताना लोकांना नेमक्‍या काय अडचणी येतात, त्या कशा सोडवायच्या, या सर्व प्रश्‍नांचं ‘वर्कबुक’ म्हणजे हे पुस्तक आहे. त्यामुळे तुमच्या ‘डाएट प्लॅन’मधील सर्व शंका यातून सोडवल्या जातात. यात उपदेश केलेला नाही, तर याची भाषा साधी, सोपी, सरळ आणि मनाला भिडणारी आहे.’’

‘दीक्षित डाएट’ ः समज, गैरसमज व पुढील वाटचाल’ या विषयावर बोलताना ते म्हणाले, ‘‘हा ‘डाएट प्लॅन’ करायला सोपा आहे, त्यासाठी मनातील भीती काढणे गरजेचे आहे. याबद्दल शास्त्रीय शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.’’

‘‘स्वतःचं वजन हे स्वतःलाच कमी करावं लागतं, त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयोगासाठी स्वतःला तीन महिने द्यायला काय हरकत आहे? त्याचा फायदा तुम्हाला दिसला तर तुम्ही करा,’’ असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

सुप्रिया वकील यांनी पुस्तकाबद्दलची भूमिका मांडली. सूत्रसंचालन ऐश्‍वर्या कुमठेकर यांनी केलं.

 ‘दीक्षित डाएट’ काय आहे?
  कडक भूक लागते तेव्हा दिवसातून दोन वेळा जेवण करा
  ५५ मिनिटांमध्ये जेवण संपवा
  गोड कमी खा
  जेवणातील प्रथिनं वाढवा, कर्बोदकं कमी करा
  दोन जेवणाच्या दरम्यान भूक लागल्यास पाणी, ताक, ग्रिन टी, ब्लॅक           टी, नारळ पाणी, टोमॅटो खा
  ४५ मिनिटांमध्ये साडेचार किलोमीटर चाला
  तुमच्या हृदयाच्या ठोक्‍यांची गती वाढते असा कोणताही व्यायाम करा

या डाएटने काय होते?
शरीरातील इन्शुलिनचं प्रमाण कमी होते, त्यामुळे ऊर्जेसाठी शरीरातील चरबी वापरली जाते. अन्यथा, ऊर्जेसाठी शरीर ग्लुकोज वापरतं. चरबी वापरली गेल्याने पोट कमी होऊ लागतं. वजन घटण्यास सुरवात होते. या सर्वाला वैद्यकीय संकल्पनांचा आधार आहे. असा ‘डाएट’ केल्याने वजन कमी होतं, पोटाचा घेर कमी होतो, ‘एचबीए १ सी’ म्हणजे तीन महिन्यांचे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होते. तसेच, ‘फास्टिंग’चे इन्शुलिन कमी होतं. या गोष्टी घडल्या तर त्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत.

loading image
go to top