
कोंढवा : पहलगाम हल्ल्याला १५ दिवस उलटून गेल्यानंतर काहीही कारवाई झालेली नव्हती. कोणताही संदेश मिळत नव्हता. भारत सरकार काय कारवाई करणार याकडेच आमचे लक्ष होते. परंतु, देशाच्या पंतप्रधानांनी मिशन सिंदूर करून आम्हा महिलांना, बहिणींना खरंच न्याय दिला आहे, हे नाव दिले हे एकदम योग्यच आहे. सकाळी बातमी कळाली की पाकिस्तान मधील दहशतवादी अड्डे आहेत ते उध्वस्त केलेत त्याबद्दल कौतुकच परंतू पाकिस्तानचा पूर्णपणे नायनाट केला पाहिजे, पंतप्रधान मोदी हे करतीलच आमचा त्यांच्यावर पुर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नी संगीता गनबोटे यांनी दिली.