

Academic Excellence: MIT Vishwashanti Gurukul Junior College Achieves 100% Result
Sakal
लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत लोणी काळभोर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल ज्युनिअर कॉलेजचे विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही शाखांमधील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. या वर्षी एकूण २७४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यामध्ये वाणिज्य शाखेतील ११५, विज्ञान शाखेतील १५३ आणि कला शाखेतील ६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.