Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार करून आता प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्येही मोफत उपचार सुरू झाले. बाह्यरुग्ण सेवेत सुमारे २ हजारांहून अधिक आजारांचा लाभ नागरिकांना मिळणार असून आरोग्य केंद्रांच्या सुविधांनाही निधी मिळणार आहे.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana

sakal

Updated on

पुणे : महात्‍मा ज्योतिबा फुले जन आरोग्‍य योजना (एमजेपीजेएवाय) ही राज्‍य शासनाची व खासगी तसेच सरकारी रुग्‍णालयात मोफत उपचार देणारी योजना आहे. आतापर्यंत या योजनेत रुग्‍णालयात दाखल राहून उपचार घेत असलेल्‍या रुग्‍णांना मोफत उपचार मिळत होते. मात्र, आता ही योजना बाह्यरुग्ण विभागाची सेवा पुरविणाऱ्या सार्वजनिक आरोग्‍य विभागाचे सर्वच उपकेंद्र व प्राथमिक आरोग्‍य केंद्र येथे लागू करण्‍यात आली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना योजनेअंतर्गत नव्‍याने समाविष्ट असलेल्या सुमारे २ हजारांहून अधिक आजारांवरील उपचारांचा आर्थिक लाभ घेता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com