esakal | तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका असल्याची 'या' राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

mla.jpg

तहसीलदार यांच्या पतीकडून जीवाला धोका असल्याचा, खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा पोलिसांत तक्रार अर्ज. 

तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका असल्याची 'या' राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली तक्रार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजगुरूनगर :  खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि तहसीलदार सुचित्रा आमले पाटील यांच्यातील संघर्ष काही थांबायचे नाव घेत नसून, आमदारांनी आमले पाटील यांच्या पतीपासून आपल्या जीविताला धोका असल्याचा तक्रार अर्ज खेड पोलिस ठाण्यात दिला आहे. खुद्द आमदारांनीच असा तक्रार अर्ज दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू

तसेच स्वतः मोहिते यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. तहसीलदार आमले यांचे संरक्षण असल्यामुळे भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांमधून, शासकीय नजराणा न भरता वाळू उपसा केला जातो. सरकारी गायरान आणि औद्योगिक क्षेत्रातून नजराना न भरता, मुरूम उपसाही होतो. कोरोना संकटातही तहसीलदारांनी काम केले नाही. कंपन्यांकडून महसूल कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गोळा केलेल्या सीएसआर निधीचाही हिशोबही तहसीलदारांकडून दिला जात नाही. दुसऱ्या बाजूला उपचार न मिळाल्याने जनता कोरोनाने बाधित होत आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष असूनही तहसीलदार समितीची बैठक घेत नाहीत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

त्याचप्रमाणे तालुक्यातील तलाठी, मंडलाधिकारी यांच्यावर तहसीलदारांचे नियंत्रण नसून, हे कर्मचारी गरीब आणि पीडित जनतेला त्रास देत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या तक्रारी आपणाकडे येतात. भोमाळे, भोरगिरी, पदरवाडी इत्यादी गावांना भूस्खलनाचा धोका असून त्यांनी त्याबात उपाययोजना केलेली नाही. गुळाणी गावातील, भगवान गुळाणकर यांनी तहसीलदारांच्या समोर विषप्राशन करून आत्महत्या केली, हे प्रकरणही दाबले गेले, असे आमदारांनी त्यांच्या तक्रारअर्जात म्हटले आहे.

अशा अनेक कारणांमुळे मी तहसीलदारांविषयी महसूलमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करून त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. तसेच विधानसभेत लक्षवेधी सूचना केली. म्हणून त्यांचे पती बाळासाहेब यांनी चिडून मी बदलीचा आग्रह धरू नये म्हणून माझी बदनामी सुरु केली. तसेच तहसीलदारांची बदली केली तर बघून घेईन अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यांचे गुंड लोकांशी संबंध आहेत. नवीन तहसीलदार येथे येऊ नयेत म्हणून दहशत करीत आहेत. या उभयतांनी अवैध संपत्ती गोळा केली आहे. ते वाळू माफिया, भूखंड माफिया आणि माझे राजकीय विरोधक यांच्या सहाय्याने, माझा घातपात करण्याची दाट शक्यता आहे. म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्यांच्याशी संबंधित इसमांचा तपस व्हावा, असे आमदारांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

loading image
go to top