
मोखाडा : तालुक्यातील कोलद्याचा पाडा येथील आशा नामदेव भुसारा (२२) या महिलेचा प्रसूती नंतर मृत्यू झाला. तिला ऊपचारासाठी मोखाडा, जव्हार तसेच नाशिक असा प्रवास करावा लागला. या घटनेची दखल घेत आमदार हरिश्च॔द्र भोये यांनी पीडीत कुटूंबाची सांत्वनपर भेट घेऊन आर्थिक मदतीचा हात दिला आहे. तसेच घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सुचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत. यावेळी विक्रमगड विधानसभा क्षेत्रात सक्षम आरोग्य यंत्रणा ऊभी करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.