
पुणे : सध्या मूळ मालक स्वतः राहत असलेल्या मिळकतींवर पुणे महापालिकेकडून ४० टक्के कर सवलत दिली जाते. मात्र, त्या मिळकतीत भाडेकरू राहत असल्यास सवलत रद्द केली जाते. हा दुजाभाव न करता सर्व मिळकतधारकांना सरसकट ४० टक्के करसवलत मिळावी, अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी बुधवारी विधानसभेत केली. पिंपरी-चिंचवड शहरात ‘टीडीआर’ केवळ दोन महिन्यांत मिळतो, तर त्यासाठी पुण्यात दोन वर्षे का लागतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.