शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट भरपाई मिळावी : आमदार कुल

सावता नवले
Saturday, 17 October 2020

अतिवृष्टीमुळे परिसरातील ओढयांना पूर झालेल्या नुकसानीचे आमदार कुल समवेत पाहणी केली. ''शेतकरी, ग्रामस्थांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरसकट भरपाई मिळावी. पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, छोटे पूल, बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. पुरामुळे खानवटे येथील चार जणांचा दुर्दैवी अंत झाला, त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. या कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी विधानभवन येथील बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. ​

कुरकुंभ(पुणे) : अतिवृष्टीमुळे दौंड तालुक्यातील खानवटे, राजेगाव, स्वामी चिंचोली, मळद, रावणगाव, नंदादेवी या गावांमध्ये झालेल्या नुकसानीची आमदार राहुल कुल यांनी पाहणी करून प्रशासनाला पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
 
अतिवृष्टीमुळे परिसरातील ओढयांना पूर झालेल्या नुकसानीचे आमदार कुल समवेत पाहणी केली. ''शेतकरी, ग्रामस्थांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरसकट भरपाई मिळावी. पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, छोटे पूल, बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. पुरामुळे खानवटे येथील चार जणांचा दुर्दैवी अंत झाला, त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. या कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी विधानभवन येथील बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन संबंधित कुटुंबियांना आमदार कुल यांनी दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

''पुराच्या पाण्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला. दुकानांमधील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. ओढयावरील पूल वाहून गेले त्या भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. तसेच सर्व बाधितांनी पंचनामे करून घ्यावेत''असे आवाहन आमदार कुल यांनी केले आहे.

यावेळी तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरीश्चंद्र माळशिखारे, भाजप तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे उपस्थित होते..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Kul inspected the damage caused due to heavy rains in daund district