

Convenience at Doorstep: MLA Rahul Kul Demands Resumption of RTO Camps in Daund
Sakal
प्रकाश शेलार
खुटबाव (पुणे) : दौंड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वाहन परवाना शिबीर कोविड काळापासून बंद आहे. तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी पुन्हा नियमितपणे सुरू करण्यात यावे, अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार कुल यांनी नुकतीच मुंबईत मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर मागणीचे निवेदन दिले. आमदार राहुल कुल यांनी सांगितले की, दौंड शहर आणि तालुक्यातील तरुण, वाहनचालक आणि नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन परवाना) व आरटीओ संबंधित इतर कामांसाठी सध्या लांबचा प्रवास करून बारामती येथे जावे लागत आहे. कोविडच्या पूर्वी दौंड येथे नियमितपणे वाहन परवाना शिबिरांचे आयोजन केले जात होते, ज्यामुळे स्थानिक पातळीवरच नागरिकांची कामे होत असत. मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ही शिबिरे तात्पुरती बंद करण्यात आली होती.