आमदार रोहित पवार यांनी केली बारामतीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

संतोष आटोळे 
Friday, 16 October 2020

आमदार रोहित पवार यांनी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गुणवडी जिल्हा परिषद गटातील जैनकवाडी, सिध्देश्वर निंबोडी, पारवडी, गाडीखेल, शिर्सुफळ, साबळेवाडी या गावांमधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला.

शिर्सुफळ : बारामती तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच विक्रमी पाऊस पडला आहे. यामध्ये शिर्सुफळ गुणवडी गटांमध्ये तीव्रता अधिक आहे. आपल्या सुदैवाने कोठेही जीवितहानी झालेली नाही. मात्र उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तर कुठे रस्ते वाहून गेले आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये सर्व पंचनामे करण्याबाबत तसेच एकही नुकसानग्रस्त मदती पासून वंचित राहणार नाहीत याबाबत प्रशासनाला सुचना करु अशी ग्वाही कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी यांनी दिली.

सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आमदार रोहित पवार यांनी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गुणवडी जिल्हा परिषद गटातील जैनकवाडी, सिध्देश्वर निंबोडी, पारवडी, गाडीखेल, शिर्सुफळ, साबळेवाडी या गावांमधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे संबंधित गावचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पवार यांनी जैनकवाडी येथील गेल्या अनेक वर्षापासून भरण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या व यंदा संपूर्ण भरुन वाहणाऱ्या गावठाण तलावाची पाहणी करुन तेथील ग्रामस्थ शेतकरी यांच्याशी संवाद साधला. तालुक्यातील सर्वाधिक नुकसानग्रास्त भाग असलेल्या सिध्देश्वर निंबोडी येथे पवार यांनी घरे वाहून गेल्याने संसार उघड्यावर पडलेल्या संतोष कांबळे, सुतार, यांच्या कुटुंबाची भेट घेवून मदतीचे आश्वासन दिले. तसेच पारवडी कडे जाणाऱ्या मार्गावरील वाहून गेलेल्या पुलांची पाहणी करुन संबंधित यंत्रणेला दुरुस्ती करण्याबाबत सुचना केली. 

Pune Rain : अनेकांसाठी ठरली रात्र वैऱ्याची; पाणी घरांत घुसल्याने नागरिकांना भरली धडकी

त्यानंतर पारवडी येथे बंधाऱ्याचा सांडावा फुटून वाहून गेलेल्या शेतीची पाहणी केली. तसेच नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना केल्या. यावेळी तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर उपस्थित होते. तर गाडीखेल, साबळेवाडी येथे भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. तर शिर्सुफळ येथे पावसात वाहून गेलेल्या स्सशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली.त्यासह ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेवुन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाहणाऱ्या पाण्यातून वाट काढत नुकसानग्रस्त कुटुंबाला भेट.. सिध्देश्वर निंबोडी येथे शेटफळ गणेश कडे जाणाऱ्या पुलावरून जोरदार पाणी वाहत होते.तसेच दोन्ही बाजूने पुल खचलेला असताना आ.रोहित पवार यांनी गाड्यांचा ताफा बाजुला ठेवत पाण्यातून चालत येवुन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली.यामुळे ग्रामस्थां मधून समाधान व्यक्त होत आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rohit Pawar inspected the flood affected area